*मुस्लिम कब्रस्थान बांधकामांना निधी उपलब्ध करून द्या*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 21/09/2021 7:36 PM

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची अल्पसंख्यांक मंत्र्यांकडे मागणी

*दिनांक २१/९/२०२१ गडचिरोली* 

*गडचिरोली  जिल्ह्यातील अनेक गावांत मुस्लिम बांधव आहेत मात्र अशा अनेक गावात मुस्लिम कब्रस्थानाची  बांधकाम झालेली नाही.  त्यामुळे अशा  गावांमध्ये कब्रस्थान बांधकामाकरिता निधीची आवश्यकता असून  या  विकास कामांसाठी  आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे  मुंबई येथे भेट घेऊन केली.*
 *भेटी दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील अशा गावांत होत असलेल्या  दुरावस्थेबाबत मंत्री महोदयांना अवगत केले.  जिल्ह्यातील मुस्लिम बांधव उद्योग व्यवसायापासून वंचित असून त्यांना सक्रिय करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात कौशल्य विकासावर आधारित नवीन उद्योग निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी मंत्रिमहोदयांना अवगत करून दिले. मुस्लीम समाजातील लोकांना आवश्यक असलेल्या या कब्रसस्थानासाठी लवकरात लवकर सदर निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंतीही त्यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन केली*

Share

Other News

ताज्या बातम्या