महाराष्ट्र हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने माननीय तालुका आरोग्य अधिकारी भामरागड यांना ११महिन्याचे काम मिळण्याकरिता निवेदन...

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 03/05/2024 9:17 PM



 गडचिरोली हा जिल्हा जंगलाने व्यापलेला असल्याने या जिल्हात पावसाचे प्रमाण खूपच जास्त असतो.  त्यामुळे डास उत्पोती स्थानांत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन हिवताप आजाराचा प्रसार होतो. त्या करिता हिवताप नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपल्या कार्यालयामार्फत दरवर्षी हंगामी क्षेत्र कर्मचारी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जातो. आपल्या कार्यलयाद्वारे मंजूर असलेल्या मनुष्यबला नुसार जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या कडून माहे जुलै ते फेब्रुवारी या कालवधीत आम्हाला हिवताप सर्वेक्षणा करिता गप्पी मासे सोडणे , अंबेटींग करणे, हिवताप घेतलेल्या रक्त नमुण्यावर  रंग प्रकिया करणे (स्ट्रेनिंग करणे) यांचे आदेश निर्गमित केले जातो. या कालावधीत आम्ही आदेशित केलेल्या आरोग्य संस्थेत रुजू होऊन दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करीत असतो त्यामुळे हिवतापाने होणारे मृत्यू कमी होतात, व हिवतापाचे रुग्णांना देखील त्वरित उपचार करून रुग्णाचे जीव वाचवित आहोत.
 गडचिरोली जिल्हा मध्ये सर्वात जास्त हिवताप रुग्णावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले यांत मोलाचा वाटा हा हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचा असून आम्हीं कर्मचारी हे आपण दिलेल्या आदेशनुसार एका कॅलेडर वर्षा मध्ये १७९ दिवसचं काम करीत असतो. यानंतर आम्हाला आपल्या कार्यालय मार्फत आदेशित केले जात नाही. त्यामुळे आम्हाला बेरोजगार , उपासरीचा सामना करवा लागतो.
   जर आपल्या कार्यालया मार्फत आम्हा हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना ११(अकरा)महिन्याचे आदेश निर्गमित केल्यास आमची बेरोजगारी, उपासमारी दूर होईल. तसेच नियमित स्वरूपात काम मिळाल्याने आम्ही हंगामी क्षेत्र कर्मचारी अधिक जोमाने निस्वार्थ भावनेने हिवताप नियंत्रणा करीत कार्य करू. तसेच डेंग्यू, जेई, चिकनगुण्या, यासारखे इतर कीटकजन्य आजारावर नियत्रंण मिळवू शकू.
 आम्ही महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने विनंती करीत आहोत की, आम्हाला एका आर्थिक वर्षी मद्ये किमान ११(अकरा) महिन्याचे आदेश देण्यात यावे. असा निवेदन संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदीप भाऊ गलबले ,भामरागड तालुकाध्यक्ष संतोष झाडे आणि तालुक्यातील सर्व हंगामी क्षेत्र कर्मचारी यांनी   यांना निवेदन दिले.......

Share

Other News

ताज्या बातम्या